PHOTO | राज्यभरात सोशल डिस्टन्सिंग पाळून साधेपणाने महाराष्ट्र दिन साजरा
जालना येथे महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण समारंभ पार पडला. जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
बुलडाण्यात पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी ध्वजारोहण केलं.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री आदित्य ठाकरे यांनी ध्वजारोहण केलं.
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ध्वजारोहण केलं.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने बीडमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ध्वजारोहण केलं.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ध्वजारोहण केलं.
राज्यात जागोजागी अत्यंत साध्या पद्धतीने आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
औरंगाबादमध्ये पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ध्वजारोहण केलं.
सांगलीत पालकमंत्री जयंत पाटील यांनी ध्वजारोहण केलं.