सोन्याची साडी परिधान केलेल्या पुण्यातील श्री महालक्ष्मी देवीचं मोहक रुप
नवरात्रीनिमित्त श्री महालक्ष्मी मंदिर आणि मंदिराबाहेर आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
श्री महालक्ष्मी देवीला सोन्याच्या साडीने आभूषित करण्याचं हे नववं वर्ष आहे. दसऱ्याच्या दिवशी हळदी-कुंकू आणि ओटीच्या कार्यक्रमाने नवरात्रोत्सवाचा समारोप झाला.
सुमारे सहा महिने ही साडी तयार करण्याचे काम सुरु होतं. आकर्षक नक्षीकाम करुन ही सोन्याची साडी साकारण्यात आली आहे.
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी देवीला ही साडी नेसवण्यात येते.
वर्षभरात केवळ दोन वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसवण्यात येते.
तब्बल 16 किलो सोन्याची साडी परिधान केलेलं देवीचं सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
पुण्यातील सारसबाग इथे असलेल्या श्री महालक्ष्मी देवीला दसऱ्याच्या निमित्ताने मंदिर प्रशासनाने सोन्याची साडी अर्पण करण्यात आली आहे.