महाड दुर्घटना : आतापर्यंत काय घडलं?
मात्र पुढील काही तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्याने शोधकार्यात अडचण येण्याची शक्यता आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसात बोटींच्या साहाय्याने शोधकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
या मोहीमेत एकूण 160 जवान जीवाची बाजी लावून बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत.
एनडीआरएफ, नेव्ही आणि कोस्टगार्डच्या मदतीने शोधमोहीम सुरु आहे, मात्र पावसामुळे त्यात व्यत्यय येत आहे.
महाड दुर्घटनेत आणखी 28 जण बेपत्ता असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुर्घटनेच्या तिसऱ्या दिवशी 17 मृतदेह सापडे आहेत. गुरुवारी शोधकार्य थांबलं त्यावेळी 14 मृतदेह सापडले होते आणि ओळख पटली होती. आज सकाळी आंबेत खाडीत आणखी तीन मृतदेह आढळले.
महाड दुर्घटनेतील बेपत्ता नागरिकांचा शोध सलग तिसऱ्या दिवशी सुरु आहे. तब्बल 59 तास उलटल्यानंतरही शोधकार्य सुरु आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -