महाड दुर्घटनेतल्या बेपत्ता प्रवाशांची नाव
प्रवाह खूप जोरात असल्यानं शोधकार्यात अडचणी
सावित्री नदीवरचा पूल रात्री 11.30 वाजता कोसळला
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल , पोलीस आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक माणगाव, बिरवाडे, दादली मार्गे वळवली
राजापूर-बोरिवली, जयगड-मुंबई एसटी बसमधील प्रवाशांच्या नातेवाईकांनी 02141-222118 किंवा 1077 या क्रमांकावर संपर्क साधावा
नदीत दूरपर्यंत बेपत्ता वाहनं आणि लोकांचा शोध घेतला जातो आहे. मात्र, या दुर्घटनेत नेमकी किती जीवितहानी झाली आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही.
एनडीआरएफ, नौदल, कोस्टगार्डसह अग्निशमन विभाग आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून बचावकार्य वेगानं सुरु आहे.
रायगड जिल्ह्यात घडलेल्या भीषण दुर्घटनेला 12 तास उलटले आहेत. मात्र, अद्यापही या दुर्घटनेत बेपत्ता झालेले प्रवासी आणि वाहनांचा शोध लागलेला नाही.