रतलामच्या महालक्ष्मी मंदिराची पैसे, मौल्यवान दागिन्यांनी सजावट
एबीपी माझा वेब टीम | 06 Nov 2018 04:18 PM (IST)
1
व्यवसायात, नोकरीत आणि शेतीला बरकत मिळावी या श्रद्धेनं हजारो लोक मंदिरात आपल्या घरातल्या मौल्यवान वस्तू आणून देतात.
2
पैसे, वेगवेगळे मौल्यवान दागिने अशी तब्बल 100 कोटींहून अधिकची रक्कम या सजावटीत वापरण्यात आली आहे.
3
कोट्यवधींचा हिशेब असूनही मंदिरातील एक रुपया इकडचा तिकडे होत नाही.
4
मध्यप्रदेशच्या रतलाम येथील महालक्ष्मीच्या मंदिराची चक्क नोटांनी सजावट करण्यात आली आहे.
5
मंदिराची देखरेख थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित आहे.
6
दिवाळीत अनेक वर्षांपासून नोटा आणि मौल्यवान दागिन्यांनी मंदिर सजवण्याची प्रथा आहे.
7
महालक्ष्मीच्या मंदिरात 5 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यानंतर भाविकांनी आणलेल्या नोटा किंवा दागिने त्यांना परतही केले जातात.