सर्जिकल स्ट्राईकचा मराठमोळा रिअल हिरो!
कारगील युद्धापासून ते कालच्या सर्जिकल स्ट्राईकपर्यंत निंभोरकर यांनी शत्रूसोबत झुंज दिली. आणि उरी बसलेल्या घावांचा बदला घेतलाय. महाराष्ट्रातील जिगबाज पराक्रमी पुत्राच्या दैदीप्यमान कर्तृत्वाला एबीपी माझाचा सलाम
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाकिस्तानशी दोन हात करताना ते जखमी झाले. पण त्यांनी हार मानली नाही. पुन्हा नव्या जोमानं शत्रूशी दोन हात करायला सिद्ध झाले.
विशेष म्हणजे अनेक शौर्य पदकांनी सन्मानित झालेले राजेंद्र निंभोरकर कारगिल युद्धामध्येही सहभागी झाले.
लष्कराच्या कारवाईच्या नियोजनापासून ते ती पूर्ण करेपर्यंत प्रत्येक टप्यावर त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक हालाचलीवर त्यांचं बारीक लक्ष होतं. त्यांच्या धाडसी नेतृत्वामुळे भारताची मोहीम फत्ते झाली.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात एका मराठमोळ्या शिलेदाराचा सिंहाचा वाटा आहे. आणि तो बाहद्दूर वीर म्हणजे लेफ्ट. जनरल राजेंद्र निंभोलकर यांचा.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतानं केलेल्या कारवाईमध्ये लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर महत्वाची भूमिका बजावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांची भेट घेऊन त्याबद्दल अभिनंदनही केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -