Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
केवळ 87 धावात गुंडाळलं, मुंबईच्या नावावर लाजिरवाणा विक्रम
आयपीएल 2018 मध्ये एखाद्या संघाने उभारलेली ही सर्वात कमी धावसंख्या आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयपीएल इतिहासातला हा दुसरा सर्वात लो स्कोअरिंग सामना ठरला. कमी धावसंख्या असतानाही प्रतिस्पर्धी संघावर मात करण्याचा विक्रम सनरायझर्स हैदराबादने केला.
हैदराबादच्या प्रभावी आक्रमणासमोर मुंबईचा अख्खा डाव 87 धावांत गडगडला. हैदराबादच्या सिद्धार्थ कौलने तीन, तर राशिद खान आणि बेसिल थम्पीने प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं.
वानखेडे स्टेडियममधल्या या सामन्यावर उभय संघांच्या गोलंदाजांनी निर्विवाद वर्चस्व गाजवलं. मुंबईने आधी या सामन्यात हैदराबादचा डाव केवळ 118 धावांत गुंडाळला होता.
सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा अवघ्या 87 धावांत खुर्दा उडवून, आयपीएलच्या सामन्यात 31 धावांनी सनसनाटी विजय साजरा केला.
मुंबई इंडियन्सचा मेण्टॉर सचिन तेंडुलकरला काल त्याच्या वाढदिवशी विजयाची भेट मिळू शकली नाही.
यापूर्वी किंग्ज इलेव्हन पंजाबने दिलेलं 119 धावांचं आव्हानही मुंबईला पेललं नव्हतं आणि तीन धावांनी पराभवाचा सामन करावा लागला होता.
दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवाची या आयपीएल मोसमातली ही दुसरी वेळ आहे.
सीएसकेने 2009 साली किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळताना 116 धावांचं आव्हान दिलं होतं. एवढं कमी धावसंख्येचं आव्हानही पंजाबला पार करता आलं नाही आणि चेन्नईने 24 धावांनी हा सामना जिंकला होता.
आपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्या उभारुन प्रतिस्पर्धी संघावर मात करण्याचा विक्रम चेन्नई सुपरकिंग्जच्या नावावर आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -