निकालाआधीच 'कार्यकर्त्यांचे खासदार' लोकसभेत, भावी खासदारांचे चौकाचौकात बॅनर लागले
लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल उद्या, 23 मे रोजी लागणार आहे. आपल्या मतदारसंघात नवा खासदार कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र काही ठिकाणी निकाल लागण्याआधीच आपल्या भावी खासदारांचे 'बॅनर' झळकत आहेत. पुणे लोकसभेचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांच्या कार्यकर्त्यांनी बापट यांना निकालाच्या आधीच खासदार करून टाकले आहे. सोबतच त्यांचे अभिनंदनही केले आहे.
सोबतच भिवंडीतून काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करणारे बॅनर देखील व्हायरल झाले आहेत.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विजयाचे देखील बॅनर व्हायरल झाले आहेत.
निकालाआधीच कोल्हेंची खासदार म्हणून फ्लेक्सबाजी केली आहे. शिरूर आणि मावळ मतदारसंघाची मतमोजणी ज्या म्हाळुंगे- बालेवाडी क्रीडा संकुलात होणार आहे. त्याच्यासमोर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पुलावर ही फ्लेक्सबाजी करण्यात आलीय.
शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचे देखील असेच बॅनर लावण्यात आले आहेत.