युवराजला मागे टाकत लोकेश राहुलचा आणखी एक विक्रम!
याआधी केएल राहुलने पहिल्या वन डेमध्ये शतक ठोकलं होतं. पदार्पणातच शतक ठोकणारा राहुल भारताचा पहिला फलंदाज ठरला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपहिल्या 3 वन डे सामन्यात राहुलच्या 196 धावा आहेत. आता नवजोत सिंह सिद्धू यांच्यापेक्षा तो केवळ 3 धावांनी मागे आहे. त्याने मनिष पांडे (181 धावा) आणि युवराज सिंहला (143 धावा) मागे टाकलं आहे.
63 धावांच्या खेळीत लोकशने युवराज सिंह आणि मनिष पांडे यांना धोबीपछाड दिली. पहिल्या 3 वन डे सामन्यात सर्वाधिक धावा बनवणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत राहुल 196 धावांसह दुसऱ्या स्थानावर आला आहे.
या वन डे सीरिजमध्ये पदार्पण करणाऱ्यांमध्ये लोकश राहुलचाही समावेश आहे. राहुलने पहिल्या 3 वन डे सामन्यातच अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
या मालिकेतील तीन सामन्यात मिळून लोकेश राहुलने 196 धावा ठोकल्या. पहिल्या सामन्यात त्याने नाबाद 100 धावा, दुसऱ्या सामन्यात 33 धावा आणि अखेरच्या सामन्यात 63 धावा कुटल्या होत्या.
झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत भारताने 3-0 असा विजय मिळवला. दमदार कामगिरी करणाऱ्या लोकेश राहुलची 'मॅन ऑफ द सीरिज' म्हणून निवड करण्यात आली. या मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात त्याने नाबाद 63 धावांनी खेळी रचली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -