Lockdown3 | दारूच्या नादात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; मद्यप्रेमींची दुकानांबाहेर गर्दी
दिल्लीमध्ये दारू महागणार आहे. अरविंद केजरीवाल सरकारने दारूच्या विक्रीवर 'स्पेशल कोरोना फी' लावली आहे. आता लोकांना दारूच्या एमआरपीपेक्षा 70 टक्क्यांनी महाग मिळणार आहे. मंगळवारपासून सकाळपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत.
केंद्र सरकारच्या दिशानिर्देशानंतर लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात अनेक राज्यांतील दारूची दुकानं उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली.
अनेक ठिकाणी दुकानांबाहेर गोळा झालेली गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
देशातील काही ठिकाणी दारूच्या दुकानांवर सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघनही करण्यात आलं.
दुकानांबाहेर गर्दी गोळा झाल्यामुळे दिल्ली, मुंबई, राजस्थान आणि आंध्रप्रदेश येथील अनेक ठिकाणी दुकानं उघडल्यानंतर काही मिनिटांनी लगेच बंद करण्यात आली.
एका दुकानात तर ग्राहकाचं फुलांचा हात घालून स्वागत करण्यात आलं. तर दुसऱ्या दुकानात ग्राहकांचं स्वागत नारळ फोडून स्वागत करण्यात आलं.
अनेक लोक दारूची दुकानं उघडण्याआधीच दुकानांबाहेर रांगेत उभे राहिले होते. दिल्ली, बंगळूरू, मुंबई आणि लखनौ यांच्यासह इतर इनेक शहरांमध्ये देशातील विविध ठिकाणी तळीरामांची गर्दी पाहायला मिळाली.
जवळपास 40 दिवसांनी देशात अनेक ठिकाणी दारूची दुकानं उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. दुकानं उघडण्यासाठी परवानगी दिल्यानंतर पहिल्याच दिवशी दुकानांबाहेर तळीरामांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी तर सोशल डिस्टंन्सिंगचं उल्लंघन केल्यामुळे दुकानं पुन्हा बंद करण्यात आली.