लेनोव्हो K5 लवकरच भारतात, पाहा किंमत आणि फिचर्स
वाईब K5 प्लसमध्ये 1.4 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 415 ऑक्टाकोअर प्रोसेसर असणार आहे. इतर फिचर्स हे वाईब K5 प्रमाणेच असतील. या फोनमध्ये 2GB ची रॅम आणि 16GB इंटर्नल स्टोअरेज असेल. शिवाय 2750 mAh क्षमतेची रिमुव्हेबल बॅटरी असणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फोनमध्ये 13 मेगापिक्सल एलईडी फ्लॅशसह रिअर कॅमेरा असेल तर 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल. हा फोन बाजारात गोल्ड आणि सिल्वर कलरमध्ये उपलब्ध होणार आहे. तर या फोनची किंमत 8 हजार 499 रुपये असणार आहे.
वाईब K5 प्लसचा लुक हा वाईब K5 सारखाच असेल. यामध्ये 5 इंच आकाराची 1280x720 पिक्सल रिझॉल्यूशन असणारी स्क्रिन असणार आहे.
लेनोव्होचा वाईब K5 प्लस हा फोन आतापर्यंत काही युरोपीय बाजारपेठांमध्ये लाँच झाला आहे. मात्र आता हा अत्यंत कमी किंमत असलेला फोन भारतात लाँच होणार आहे.
लेनोव्हो कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीलाच आपला वाईब K5 हा स्मार्टफोन लाँच केला होता. आता लेनोव्हो वाईब K5 चं मिडबजेट व्हर्जन वाईब K5 प्लस या महिन्यात भारतात लाँच करण्याची शक्यता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -