'हे' गोलंदाज होते सचिन, द्रविड, लक्ष्मण, सेहवाग यांसारख्या दिग्गजांचा अडथळा
भारतीय संघाची फलंदाजी ही जगभरात ओळखली जाते.
सचिननंतर भारताची 'दी वॉल' अशी ओळख असणारा दिग्गज राहुल द्रविडला ब्रेट ली ने 12 वेळा परत पाठवलं आहे.
यामध्ये सर्वात आघाडीचं नाव आहे ते ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ब्रेट ली चं, ली ने सचिनला जवळपास एकदा दोनदा नव्हे तर तब्बल 14 वेळा आऊट केलं आहे.
मात्र भारताच्या या दिग्गजांचेही काही गोलंदाज विक पॉईंट होते. ज्यांच्यासमोर भारताचे हे दिग्गज अनेकदा अपयशी झाले.
कर्णधार धोनीला इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने आतापर्यंत 10 वेळा पव्हेलियनमध्ये पाठवलं आहे.
ब्रेट ली नंतर भारतीय फलंदाजांचा सर्वात मोठा अडथळा होता, तो म्हणजे मुथय्या मुरलीधरन. मुथय्याने गांगुलीला तब्बल 13 वेळा आऊट केलं.
या सर्वांनंतर सेहवागही अनेकदा ब्रेट ली चा शिकार झाला. सेहवाग ला ब्रेट ली ने 11 वेळा आऊट केलं आहे.
व्हीव्हीएस लक्ष्मणला ब्रेट ली ने 10 वेळा बळी बनवलं.
भारताचे दिगग्ज राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आपलं नाव उमटवलं आहे.