लातूर–मुंबई एक्सप्रेसवरुन उदगीर आणि लातूरकर आमनेसामने
लातूरकरांच्या निर्णयाला उदगीरकरांनी मात्र विरोध केला, लातूर एक्स्प्रेस बिदरहूनच कायम ठेवा, अशी मागणी उदगीरकरांनी केली आहे.
गाडी बिदरहून सोडण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी लातूरकर आक्रमक झाले आहेत.
लातूर येथून सुटणारी लातूर-मुंबई एक्स्प्रेस बिदरहून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या गाडीत लातूरकरांनाच जागा मिळत नाही, तर बिदरहून सोडल्यानंतर आणखी प्रवाशांची भर पडेल, त्यामुळे लातूरकरांची आणि पुढच्या प्रवाशांची गैरसोय होईल, असं लातूरकरांचं म्हणणं आहे.
लातूरमध्ये यासाठी लातूर रेल्वे संघर्ष समितीची स्थापन करण्यात आली. तर उस्मानाबादमध्ये व्यापारी महासंघाने बंद पुकारला. आधीच ओव्हरलोड असणारी गाडी बिदरहून सोडल्याने हा विरोध तीव्र झाला आहे.
लातूर स्टेशनला सध्या छावणीचं स्वरुप आलं आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.
बिदरहून लातूर – मुंबई एक्सप्रेस सोडण्याला लातूरमध्ये तीव्र विरोध करण्यात येत आहे. या निर्णयाच्या विरोधात लातूर आणि उस्मानाबादमध्ये आज (शुक्रवारी) बंद पुकरण्यात आला आहे.