लातूरच्या विसर्जन मिरवणुकीत भारतातील विविधतेचं दर्शन
पाहा आणखी फोटो
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाहा आणखी फोटो
पाहा आणखी फोटो
पाहा आणखी फोटो
पाहा आणखी फोटो
पाहा आणखी फोटो
पाहा आणखी फोटो
यापूर्वी जगन्नाथ रथ यात्रा, केरळ संस्कृती असे अनेक सुंदर देखावे सादर करण्यात आले आहेत.
पाहा आणखी फोटो
रक्तदानाची आवश्यकता लक्षात घेऊन रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येतं. यावर्षी बरसण्याची होळी सादर करण्यात येणार आली. यासाठी सेलम, सोलापूर, मणिपूर येथून रंगभूषेचं साहित्य मागविण्यात आलं.
वृक्षारोपण, जलपुनर्भरण, दिव्यांगांना आर्थिक मदत, अनाथांना शालेय साहित्याचं वाटप दरवर्षी करण्यात येतं.
गणेश मंडळासाठी जमणारा निधी हा सामाजिक उपक्रमासाठी खर्च करण्यात येतो. यातूनच जलयुक्त लातूरसाठी दुष्काळात चार लाखाचा मदतनिधी देण्यात आला होता.
यातूनच काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या विविध राज्यातील काही थीम घेऊन सादरीकरण करण्यात येत आहे. यासाठीचा खर्च प्रत्येक सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांनी स्वतःचा खर्च स्वतः करायचा हा नियम आहे.
काही वर्षांपूर्वी गणपती समोर देखावे करण्यात येत होते. मात्र विसर्जन मिरवणुकीतच आपण स्वतः वेगळा संदेश देणारे देखावे केले तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं शक्य आहे हे हेरून त्यावर काम केले गेलं.
सामाजिक एकात्मता, सर्वधर्मसमभाव आणि भारतातील विविध वेशभूषा, परंपरांचं दर्शन विसर्जन मिरवणुकीतून करण्याचा वेगळा पॅटर्न या मंडळाने निर्माण केला आहे. ही विसर्जन मिरवणूक पाहाण्यासाठी सर्वसामान्य लातूरकरांनी प्रचंड गर्दी केली होती.
लातूर शहरातील बाप्पा गणेश मंडळाचा दरवर्षी विसर्जन मिरवणुकीत असणारा जिवंत देखावा कायमच लक्षवेधी असतो. गेल्या 29 वर्षांपासून लातूरच्या बाजारपेठेत बाप्पा गणेश मंडळाची स्थापना केली जाते.
भारतातील विविधतेचं लातुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत दरवर्षी दर्शन होतं. या वर्षी बरसण्याची होळी... 40 राधा, 40 कृष्ण, 50 उत्सवकर्मी, 35 मृदंग वादक, एक रथ आणि साथीला ढोल पथकासह विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -