मंगेशकर कुटुंबीयांच्या गेट टुगेदरचे फोटो लतादीदींकडून शेअर
एबीपी माझा वेब टीम | 12 Jun 2016 03:58 PM (IST)
1
सुप्रसिद्ध गायक लता मंगेशकर यांनी ट्विटर अकाऊंटवरुन गेट टुगेदरचे फोटो शेअर केले आहेत. आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले यांचा 11 जून रोजी वाढदिवस होता. त्या निमित्ताने घरगुती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
2
यावेळी वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन करण्यात आलं. आनंद भोसले यांनी कुटुंबासोबत वाढदिवसाचा केक कापला.
3
लता दीदींनी आनंद यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे.
4
या खास सेलिब्रेशनसाठी लता दीदींनी आनंद यांच्या खास आवडीचा पदार्थ बनवला होता, असं दीदींनी स्वतः सांगितलं आहे.
5
लता दीदींनी आनंद भोसले यांच्या पहिल्या वाढदिवसाचा फोटो देखील शेअर केला आहे.
6
यावेळी आशा भोसले यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते.