विदर्भाचं नंदनवन चिखलदरा पर्यटकांनी फुललं
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवीस फुटांवर कोणतं वाहन येतंय आणि कोणता व्यक्ती उभा आहे हे सुद्धा दिसत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात चिखलदरामध्ये धुकं पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य : शेखर जोशी)
याच चिखलदऱ्यात पाच दिवसांपूर्वी पाऊस आल्याने मागील पाच दिवसांपासून या परिसरात धुक्याची चादर पसरली आहे. त्यामुळे सध्या येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. (फोटो सौजन्य : शेखर जोशी)
विदर्भात निसर्गरम्य स्थान असलेल्या चिखलदऱ्यात पाच दिवसांपूर्वी उत्तम पाऊस झाला आणि लगेच याठिकाणी या परिसरात धुक्याची चादर पसरली आहे. (फोटो सौजन्य : शेखर जोशी)
सातपुडा पर्वतरांगेत एक हजार मीटर उंचीवर असलेले विदर्भातील नंदनवन म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिखलदरा एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. (फोटो सौजन्य : शेखर जोशी)
धुक्याची चादर पसरली की लगेच याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होते. राज्यातून नव्हे तर परराज्यातील पर्यटक सुद्धा येथे फिरायला येतात आणि धुक्याचं आनंद घेतात.(फोटो सौजन्य : शेखर जोशी)
सोबतच याठिकाणी पर्यटकांना स्वारीसाठी घोडा, चारचाकी सफारी वाहनं, उंट सुद्धा आहे. त्यामुळे एकदातरी चिखलदऱ्याला नक्की भेट द्या. (फोटो सौजन्य : शेखर जोशी)
चिखलदरा याठिकाणी अनेक पॉईंट आहे जिथे पर्यटक आवर्जून हजेरी लावतात. यात देवी पॉईंट, भीम कुंड, गाविडगड किल्ला आणि छोट-छोटे धबधबे याठिकाणचं आकर्षक आहे. (फोटो सौजन्य : शेखर जोशी)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -