मुंब्रा बायपासवर दरड कोसळल्यामुळे वाहतूक कोंडी
एबीपी माझा वेब टीम | 30 Aug 2016 10:15 AM (IST)
1
2
3
4
5
6
मुंबई-नाशिक महामार्गावर मुंब्रा बायपासवर मध्यरात्री दरड कोसळण्याची घटना घडली आहे. ट्रेलरवर ही दरड कोसळली, मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. रेहमानिया रुग्णालयाजवळील ही घटना आहे.
7
घटनेची माहिती मिळाल्यानंतर दरड हटवण्यासाठी यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान मार्गावर सध्या वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी अजून काही तासांचा अवधी लागणार आहे.
8