अवघ्या विसाव्या वर्षी कायली बनली अब्जधीश
कायलीच्या कंपनी आजवर 63 कोटी डॉलरचे सौंदर्यप्रसाधनांची विक्री केली आहे.
'कायली कॉस्मेटिक्स' नावाच्या सौंदर्यप्रसाधन कंपनीची ती मालक आहे.
कायलीने तिच्या कंपनीची सुरुवात 29 डॉलर म्हणजेच जवळपास 1990 रुपयांच्या लिप किटपासून केली होती.
फोर्ब्स मासिकानं दिलेल्या माहितीनुसार कायलीची संपत्ती सध्या 61 अब्ज 74 कोटींच्या घरात आहे. कायलीची कंपनी 'कायली कॉस्मेटिक्स'ची उलाढाल 54 अब्जांच्या आसपास आहे.
दोन वर्षापूर्वी कायलीने या कंपनीची स्थापना केली होती. अवघ्या दोनन वर्षात कंपनीने एवढा मोठा टप्पा गाठला आहे.
कायलीने फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना मागे टाकलं आहे. मार्क झुकरबर्ग वयाच्या 23व्या वर्षी अब्जाधीश बनले होते. मात्र कायलीने अवघ्या 20व्या वर्षी हे यश संपादित केलं आहे.
अमेरिकेतील कायली जेनर सर्वात कमी वयात अब्जाधीश ठरली आहे.
फोर्ब्स'नं अमेरिकेतील 'सेल्फ मेड बिलेनिअर'ची यादी जाहीर केली. यामध्ये काइली जेनर 19व्या स्थानावर आहे.