कोपर्डी निकाल: उज्ज्वल निकम यांनी नेमका काय युक्तीवाद केला?

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App

त्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तीवाद केला. तीनही आरोपी प्रौढ आहेत, त्यांनी जाणीवपूर्वक हे कृत्य केलं आहे. त्यांना कमी शिक्षा दिली तर ते पुन्हा असं कृत्य करणार नाहीत याची खात्री नाही. त्यामुळे न्यायलयाने तीनही आरोपींना फाशीच द्यावी, असं उज्ज्वल निकम म्हणाले.
अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात काल आरोपी नंबर 1 जितेंद्र शिंदे आणि आरोपी नंबर 3 नितन भैलुमे यांच्या शिक्षेवर युक्तीवाद झाला होता. त्यामुळे आज या खटल्यातील दुसरा दोषी संतोष भवाळ, याचे वकील बाळासाहेब खोपडे यांनी सुरुवातीला शिक्षेवर युक्तीवाद केला. घटना दुर्देवी आहे, मात्र प्रत्येकाला बचावाचा, अधिकार आहे. त्यामुळे शिक्षेच्या सुनावणीवर कोणतासाही सामाजित दबाव नसावा, असा युक्तीवाद दोषीच्या वकिलांनी केला.
ज्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला, त्या कोपर्डी खटल्यातील दोषींच्या शिक्षेची सुनावणी आज पूर्ण झाली. या खटल्याचा निकाल आता येत्या 29 नोव्हेंबरला लागणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -