कोपर्डीच्या चौका-चौकात शांतता, बिथरलेलं गाव चिडीचूप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Nov 2017 11:29 AM (IST)

1
सकाळपासून गावातील नागरिकांनी दुचाकींवरुन अहमदनगर गाठलं. नगर जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
देशाचं लक्ष लागलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा आज निकाल येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सुमारे अडीच हजार लोकवस्ती असलेलं कोपर्डी गाव चिडीचूप आहे.

3
गावकऱ्यांचे व्यवहार आपोआप थांबले आहेत. गावातील प्रत्येक चौकात फक्त आणि फक्त निकालाचीच चर्चा आहे.
4
पीडित कुटुंब ही याच गावातील आणि तीनही आरोपी याच गावातील असल्यामुळे, या खटल्याचा निकाल काय लागतो, याकडे गावकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
5
कोपर्डीमध्ये अघोषित बंद असल्याचं वातावरण असल्यामुळे, नगर जिल्ह्यातील हे छोटेसं गाव अगदी सामसूम आहे. गावातील शाळा, दुकाने बंद आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -