कोल्हापूरच्या अंबाबाईचे दागदागिने
उत्सव कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त आणि 30हून अधिक CCTV ची नजर असेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंबाबाई मंदिराची शिखरे आणि मंदिराच्या भोवताली विद्युत माळा लावण्याचं काम सुरु आहे. 20 सप्टेंबरपासून प्रत्यक्ष विद्युत रोषणाई सुरूवात होणार आहे.
तसंच चांदीची प्रभावळ,पालखी, पालखींचे तोंड, दांडा,चौर्या मूर्ती, अभिषेकाची भांडी अशा विविध दागिन्यांची आणि देवीचे नित्यालंकार यासह खास नवरात्रात घातले जाणारे अलंकार यांची आज मंदीर परीसरात स्वच्छता केली.
सोन्याच्या दागिन्यांमध्ये कोल्हापुरी साज, मोहनमाळ, 2 वाळे, 2 कुडले, किरीट, पिंपळपान, 2 सातपदरी कंठी, जोंधळेपोत, चंद्रहार, लप्पा, 1 कोल्हापुरी जडावाचा साज, मोत्यांची माळ, चिंतामणी, दोन पदरी कंठी, चिंचपेटी, 2 मोतीहार, जडावाचा चारपदरी साज, सोन्याची तनपटी , चिंचपेटी, कंठी , या दागिन्यांनी नवरात्रौत्सवात देवीला मडवण्यात येतं.
कोल्हापूरच्या अंबाबाई देवीला नित्यविधीतील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची आज स्वच्छता करण्यात आली.
शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात जय्यत तयारी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून देवीला परिधान करण्यात येणाऱ्या दागिन्यांना पॉलिश करुन ते दागिने तयार करण्यात आले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -