कोल्हापूरच्या अंबाबाईची दशभुजा महाकाली रुपातील पूजा
एबीपी माझा वेब टीम | 22 Sep 2017 04:22 PM (IST)
1
2
शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची ‘दशभुजा महाकाली’ रूपातील पूजा बांधण्यात आली. दशभुजा महाकाली ही दुर्गा सप्तशतीमधील प्रथम चरित्राची नायिका. विष्णू आणि मधु-कैटभ कथेमध्ये या महाकालीचा आविर्भाव. काजळाप्रमाणे काळी, दशवक्त्र, दशभुजा आणि दशपाद अशी ही महाकाली. देवीच्या दहा हातांमध्ये खड्ग, चक्र, गदा, बाण, धनुष्य, परीघ, शूल, भृशुन्डी, असुराचे छिन्नमस्तक, शंख अशी आयुधे आहेत. देवीने विष्णूच्या शरीरापासून वेगळे होऊन त्याला जागे केले आणि मधु- कैटभ या दैत्यांचा नाश करविला.