बॉक्स ऑफिसवर सुलतान ४०० कोटींची कमाई
चार दिवसांच्या कमाईतही सुलतानने नवा रेकॉर्ड बनवला आहे. सुलतानने चार दिवसांत १४२ कोटी रुपये कमाई केली. यापूर्वी हा रेकॉर्ड आमीर खानच्या धूम ३ने केला होता. या चित्रपटाने १२८ कोटीची कमाई केली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुलतानने पाकिस्तानमध्ये मोठी धूम माजवली. या चित्रपटाने पाकिस्तानमध्ये पहिल्या पाच दिवसात १५ कोटीचा गल्ला कमावला
पीके चित्रपट यशराज बॅनेर खाली बनला असून यशराज बॅनेरचा आत्ता पर्यंतचा सर्वात जास्त कमाईचा रेकॉर्ड आहे. तर आमीर खानच्या धूम ३ ने ओपनिंग विकेंडमध्ये १०७ कोटीची कमाई केली होती.
सलमान सोबतच विकेंडला १८० कोटी कमाई करणारा हा पहिला चित्रपट आहे. या पूर्वी अनुष्काच्या पीकेने ९५.२१ कोटी कमाई केली होती.
ओपनिंग विकेंडमध्ये १८० कोटीची सर्वात जास्त कमाई करणारा सलमानचा हा पहिला चित्रपट आहे. याच्या पूर्वी प्रेम रतन धन पायो या चित्रपटाने १२९.७७ कोटीची कमाई केली होती.
स्पोर्टसवर बनलेल्या चित्रपटांच्या यादीतही हा चित्रपट अव्वल स्थानी आहे. स्पोर्टसवर आधारीत भाग मिल्खा भागने पहिल्या तीन दिवसात ५२.४४ कोटी, प्रियंका चोप्राचा मेरी कॉम १२.७ कोटींची कमाई केली होती.
सलमान खानचा शंभर कोटीची कमाई करणारा हा दहावा चित्रपट आहे. दबंग(२०१०), रेडी (२०११), बॉडीगार्ड (२०११), एक था टायगर (२०१२), दबंग २ (२०१२), जय हो (२०१४), किक (२०१४), बजरंगी भाईजान (२०१५), प्रेम रतन धन पायो (२०१६), सुलतान(२०१६) हा चित्रपट आहे.
२०१६ मध्ये १०० कोटीच्या वर कमाई करणाऱ्यांमध्ये अक्षय कुमारचा एअरलिफ्ट आणि हाऊसफुल ३ हे चित्रपटही सहभागी आहे.
हा चित्रपट पहिल्या तीन दिवसात १०० कोटींच्या वर कमाई करण्याच्या यादीत हा सहभागी झाला आहे. २०१६मध्ये रिलीज झालेल्या एअरलिफ्टने पहिल्या तीन दिवसांत ८३.५० कोटी कमाई केली होती.
या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत १०५ कोटींचा गल्ला गोळा केला. यापूर्वी बजरंगी भाईजानने तीन दिवसांत १०२ कोटी तर प्रेम रतन धन पायो ने १०१ कोटी रुपये कमावले होते.
सलमानचे आजपर्यंत दोन चित्रपट बुधवारी रिलीज झाले होते. सुलतान आणि दुसरा एक था टायगर. या दोन्हींमध्येही सुलतानच वरचढ ठरला आहे. एक था टायगरने पहिल्या दिवशी ३३ कोटीची कमाई केली होती.
पहिल्या दिवशीच्या कमाईचा रेकॉर्डही सुल्तानने तोडला आहे. सलमानच्या एक था टायगरने पहील्या दिवशी ३३ कोटी, बजरंगी भाईजानने २७.२५ कोटी, किकने २६.५२ कोटीची कमाई केली होती. हे तिन्ही चित्रपटही ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाले होते.
सुलतानने रिलीजच्या आधीच एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीचे अॅडव्हान्स बुकींग तब्बल २० कोटी झाले होते. हा आकडा सलमानच्या बजरंगी भाईजान आणि किकपेक्षाही जास्त आहे.
ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणाऱ्या चित्रपटांच्या यादीतही या चित्रपटाने अव्वल स्थान गाठले आहे. यापूर्वी शाहरूखच्या चेन्नई एक्सप्रेसने हा बहुमान पटकावला होता. चेन्नई एक्सप्रेसने ३३.१ कोटींची कमाई केली होती. पण सुल्तानने चेन्नई एक्सप्रेसचा हा विक्रम मोडीत काढला आहे.
पहिल्या दिवशी 36 कोटीचा गल्ला गोळा करून चालू वर्षातील ओपनर फिल्म ठरली आहे. या वर्षीच शाहरूख खानचा फॅन या चित्रपटाने पहिल्या दिवशी 19 कोटी कमाई केली होती. आता हा विक्रम तोडून सलमानच्या सुलतानने अव्वल स्थान गाठले आहे.
सलमानचा 200 कोटींची कमाई करणारा हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी किक आणि प्रेम रतन धन पायो यांनी रिलीजच्या पहिल्या दिवसांत 200 कोटींची कमाई केली. तर बजरंगी भाईजान 300 कोटीची कमाई केली होती.
सुलतानने पहिल्या सात दिवसांत 200 कोटींचा गल्ला गोळा केला. पीके, बजरंगी भाईजान, धूम 3 या चित्रपटांना हा टप्पा गाठण्यासाठी नऊ दिवस लागले.
दुसरीकडे वर्ल्डवाइड कलेक्शनचे आकडे पाहिले तर सुलतानने 423.32 कोटींची कमाई केली. वर्ल्डवाइड कमाईत सुलतानची कमाई टॉप पाचमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत तिसऱ्या स्थानी धूम 3 (542 कोटी) आहे. दुसऱ्या स्थानी बजरंगी भाईजान (626 कोटी), तर पहिल्या स्थानी आमीर खानचा पीके (792 कोटी) यांचा क्रमांक आहे. सुलतानने सात दिवसांच्या आत 23 मोठे रेकॉर्ड तोडले आहेत.
बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानचा चित्रपट सुलतानने अनेक नवे विक्रम केले आहेत. या चित्रपटाने रिलीजच्या नऊ दिवसांत २०० कोटींहून जास्त कमाई केली. ट्रेड अॅनेलिस्ट तरण आदर्शनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी 36.54 कोटी, दुसऱ्या दिवशी 37.32 कोटी, तिसऱ्या दिवशी 31.67 कोटी, चौथ्या दिवशी 36.62 कोटी, पाचव्या दिवशी 38.21 कोटी, सहाव्या दिवशी 15.54 कोटी, सातव्या दिवशी 12.92 कोटी, आठव्या दिवशी10.82 कोटी आणि नवव्या दिवशी 9.52 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशा प्रकारे या चित्रपटाने गेल्या नऊ दिवसांत 229.16 कोटींची कमाई केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -