मागील 70 वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किती वाढला पगार?
फेब्रुवारी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी जस्टिस अशोक कुमार माथुर यांच्या अध्यक्षतेखाली सातवा वेतन आयोग गठीत केला होता.
सातव्या वेतन आयोगानं किमान वेतन 7,730 रुपयावरुन 18 हजार केलं आहे. म्हणजेच 2.32 टक्के वेतनवाढ केली आहे.
सहाव्या वेतन आयोगानं 2006 साली किमान वेतन 3050 वरुन 7730 रुपये केलं. म्हणजेच 2.54 टक्के वेतनवाढ करण्यात आली.
स्वातंत्र्यानंतर सगळ्यात मोठी वेतनवाढ ही पाचव्या वेतन आयोगानं दिली. 1995 साली किमान वेतन 3050 रुपये करण्यात आलं. म्हणजेच 3.21 टक्के वेतनवाढ देण्यात आली.
1986मध्ये चौथ्या वेतन आयोगानं किमान वेतन 260 रुपयाहून 950 रुपये केलं. म्हणजेच 3.65 टक्के वेतनवाढ देण्यात आली.
तिसऱ्या वेतन आयोगानं 1973 साली किमान वेतन 80 रुपयाहून 260 रुपये केलं. म्हणजेच 3.25 टक्के वेतनवाढ करण्यात आली.
1959मध्ये दुसऱ्या वेतन आयोगानं किमान वेतन 80 रु. एवढं केलं. म्हणजेच 2.28 टक्के वेतनवाढ करण्यात आली.
पहिला वेतन आयोग 70 वर्षापूर्वी गठीत करण्यात आला होता. 1946 या आयोगानं किमान वेतन 35 रुपये एवढं ठेवलं होतं.
7व्या वेतन आयोगाच्या मंजुरीनंतर किमान मूळ वेतन 18000 रुपये झालं आहे. पण तुम्हाला माहित आहे का 70 वर्षापूर्वी वेतन आयोग गठीत करण्याता आला होता तेव्हा किमान मूळ वेतन किती होतं ते?
केंद्रीय कॅबिनेटनं सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजूरी देत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 23.6 टक्के वाढ केली आहे. यानं पेन्शनधारक मिळून तब्बल 1 कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.