मोदी ते ओबामा.. जगातील अतिमहत्वाच्या व्यक्तींकडे 'या' गाड्या!
भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी मर्सिडिझ बेंझ एस-600 या गाडीचा वापर करतात. या बुलेटप्रूफ कारला बनवण्यासाठी स्पेशल स्टिलचा वापर करण्यात आला आहे. या कारमधून राष्ट्रपती कोणत्याही मंत्रालयाच्या अधिकाऱ्याशी थेट संपर्क साधू शकतात. या गाडीची किंमत 12 कोटी रुपये असल्याचं बोललं जातं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचीनचे राष्ट्रपती जगातील सर्वात महागड्या गाडीपैकी एक हॉन्क्वी लिमोझिन या कारचा वापर करतात. या गाडीची किंमत 5.2 कोटी रुपये आहे.
अमेरिका राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची गाडी अमेरिकेच्या इतर राष्ट्राध्यक्षांपेक्षा वेगळी आहे. या गाडीमध्ये ड्रायव्हरसाठी स्पेशल व्हिडिओ सिस्टिम आहे, ज्याद्वारे ड्रायव्हर अंधार आणि धुक्यामध्ये ही गाडी चालवू शकतो.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 सिरिज बीएमडब्ल्यू ही बुलेटप्रूफ गाडी वापरतात. सुरक्षेच्या कारणांसाठी ही गाडी विशेष ओळखली जाते. या गाडीची किंमत 12 कोटी रुपये आहे.
इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ स्टेट लिमोझिन गाडीचा वापर करतात. ही जगातील सर्वात महागडी आणि सुरक्षित कार मानली जाते. या गाडीचा प्रत्येक पार्ट बुलेटप्रूफ आहे. या गाडीची किंमत 10 कोटी रुपये आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -