भूतानचे राजे सहपरिवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभूतानसोबतची मैत्री वृद्धींगत होण्यासाठी राजांची भारतभेट आंतराष्ट्रीय संबंधांच्या दृष्टीने नक्कीच लाभदायक ठरणार आहे.
डोकलामच्या वादानंतर ते पहिल्यांदाच भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. चीन आणि भारताच्या या वादात त्यांनी भारतालाच पाठिंबा दर्शवला होता.
राजा जिग्मे यांनी गादीवर आल्यापासूनच जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. तर जगातल्या सर्वात तरुण राजाचा मानही त्यांनाच मिळाला आहे.
आणि भेटीत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं या छोट्याशा राजकुमारानं... राजकुमार जिग्मे नामग्येल वांगचूकनं.
दोन दिवसांपूर्वीच राजा, राणी आणि त्यांचा चिमुकला भारत दौऱ्यावर आले आहेत. सुषमा स्वराज यांनी विमानतळावर त्यांचं शाही थाटात स्वागत केलं.
भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक हे चार दिवसांसाठी भारताच्या दौऱ्यावर आले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -