खिलाडी Vs किंग खान, कोण बनवणार 'या' सुपरहिट सिनेमाचा रिमेक?
एबीपी माझा वेब टीम | 05 Jul 2016 12:38 PM (IST)
1
दोघांच्या या लढाईत कोण बाजी मारतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
2
अक्षय कुमारनंतर शाहरुखने रोहित शेट्टीसोबत 'थेरी'चा रिमेक करण्याची तयारी सुरु केली असल्याचं बोललं जात आहे.
3
अक्षय कुमारचं होम प्रोडक्शन असलेल्या हरी ओम प्रोडक्शन हाऊसने 'थेरी'चा रिमेक बनवण्यासाठी दिग्दर्शक इल्लयाथलापथी विजय यांच्याशी संपर्क केला आहे.
4
'थेरी' सिनेमा 14 एप्रिला रिलीज झाला असून चेन्नईमध्ये अजून हाऊसफुल चालू आहे. 'थेरी'ने तामिळ सिनेमात जलद 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश करण्याचा विक्रम केला आहे.
5
अभिनेता शाहरुख खान आणि खिलाडी अक्षय कुमार यांच्यात एक वेगळीच स्पर्धा सुरु झाली आहे. तामिळ दिग्दर्शक इल्लयाथलापथी विजय यांचा सुपरहिट सिनेमा 'थेरी'चा रिमेक बनवण्यावरुन दोघांची स्पर्धा लागली असल्याचं बोललं जात आहे.