देवभूमीवर अवकृपा, केरळमध्ये महाप्रलय

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App

केरळमधल्या पूरग्रस्तांच्या मदतीला आता अनेक टेलिकॉम कंपन्याही पुढे आल्या आहेत. पुढील सात दिवस केरळमध्ये दुरध्वनी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी फोन कॉल आणि मोबाईल डाटा वापर विनामुल्य देण्याचं ठरवलं आहे. रिलायन्स जिओ आणि बीएसएनएलकडूनही मोफत टेलिफोन सेवा पुरवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय वोडाफोन, भारती एअरटेल, आयडिया सेल्युलर यांच्यातर्फेही पुढचे सात दिवस दुरध्वनी सेवांमध्ये काही महत्त्वाच्या सवलती देण्यात आल्या आहेत.
केरळातील या पूरपरिस्थीतीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाहणी केली. केरळला 500 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. त्याआधी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासोबत त्यांनी बैठकही घेतली. काल रात्रीच मोदी तिरुअनंतपुरममध्ये दाखल झाले होते. आजही केरळमधील पूरपरिस्थिती कायम आहे. हवामान विभागानं राज्यातील 13 जिल्ह्यांत रेड अलर्ट जाहीर केला आहे.
केरळमध्ये आतापर्यंत 324 जणांनी आपले प्राण गमावले आहेत, तर 80 धरणांचे दरवाजे उघडले असून 22 लाख 31 हजार 139 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं आहे. 1500 कॅम्पमध्ये या नागरिकांना ठेवण्यात आलं आहे. केरळ सरकारला मदत करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
गेल्या 100 वर्षांतील सर्वात भीषण महापुराचा सामना करणाऱ्या केरळला देशातील इतर राज्यांमधून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. दिल्ली सरकारने 10 कोटी, तेलंगणा, 25 कोटी, आंध्र प्रदेश 10 कोटी आणि पंजाब सरकारने केरळला 10 कोटींचं अर्थसहाय्य जाहीर केलं असून तातडीने ही रक्कम देण्यात येणार आहे. शिवाय केंद्र सरकारने याआधीच शंभर कोटी दिले असून लागेल तेवढी मदत देण्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलं आहे.
केरळला आतापर्यंत साडे आठ हजार कोटींचं नुकसान झालं आहे. वीज, रस्ते आणि सर्व जनजीवन विस्कळीत झालं असून पदार्थांचीही सध्या उणीव आहे. केरळच्या मदतीसाठी देशातली सर्व राज्य एकवटली आहेत. दिल्ली, पंजाब, तेलंगणा या राज्यांनी आर्थिक मदत दिली आहे. तर भारतीय रेल्वेकडून आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे.
सतत कोसळणारा पाऊस आणि महापुरामुळे केरळमध्ये गेल्या शंभर वर्षातील सर्वात मोठी जीवितहानी झाली आहे. या महापुरात आतापर्यंत 324 नागरिकांचा मृत्यू झाला असून जवळपास सव्वा दोन लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. याआधी 1924 साली केरळमध्ये पावसामुळे अशी भीषण आपत्ती आली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -