धमा'केदार' जाधव 'मॅन ऑफ दि सीरिज'चा मानकरी
तुफान फलंदाजी करणारा केदार जाधव अवघा एक चेंडू बाकी असताना बाद झाला आणि भारताच्या विजयाच्या आशा धुसर झाल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोलकात्याच्या वन डे सामन्यात इंग्लंडनं दिलेल्या 322 धावांचा पाठलाग करताना केदार जाधव पुन्हा एकदा हिरो ठरला. एकाकी झुंज देत केदारने 75 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि एक षटकार ठोकत 90 धावांची खेळी केली.
इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेमध्ये टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या केदार जाधवला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.
पुणे वनडेमध्ये केदार हा सर्वात जलद शतक ठोकणारा सहावाच भारतीय फलंदाज ठरला आहे. कौतुकाची गोष्ट म्हणजे अवघ्या 13 वनडे सामन्यांचा अनुभव असतानाच त्याने ही मजल मारली.
कटक येथे रंगलेल्या दुसऱ्या वन डे सामन्यात केदारने अखेरच्या क्षणी 9 चेंडूत 22 धावा केल्या होत्या.
तीन सामन्यांत 230 धावा ठोकणाऱ्या केदारला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. केदार जाधवने मालिकेत दबावाखाली खेळून चांगली फलंदाजी केली.
केदार जाधवने अवघ्या 76 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 4 षटकार लगावून 120 धावा रचल्या. केदारच्या तडाखेबाज खेळीमुळे टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहचली. केदारचं वनडे मधलं हे दुसरंच शतक होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -