गडकरींच्या हस्ते कतरिनाला 'स्मिता पाटील पुरस्कार' प्रदान
हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल अभिनेत्री कतरिना कैफला 'स्मिता पाटील स्मृती पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
याच सोहळ्यात प्रख्यात अभिनेत्री जुही चावला हिलासुद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तिच्या सामाजिक भानाबद्दल हा सन्मान करण्यात आला.
गेल्याच आठवड्यात कतरिनाचा 'बार बार देखो' हा पुरस्कार प्रदर्शित झाला, मात्र तो बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवू शकला नाही
कतरिना कैफला दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या नावे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ट्विटरवर तिची खिल्ली उडवण्यात आली.
प्रियदर्शिनी अकादमीतर्फे कतरिना कैफला हा पुरस्कार प्रदान करुन गौरवण्यात आलं.
आपल्याला आयुष्याचं ध्येय प्राप्त झालं असून त्याच्याशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करु, असं तिने पुरस्कार स्वीकारल्यानंतर म्हटलं.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुंबईत एका सन्मान सोहळ्यात कतरिनाला सन्मानित करण्यात आलं.