कर्नाटकातील बिदरमध्ये मराठा समाजाचा मूक मोर्चा
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा | 19 Oct 2016 01:03 PM (IST)
1
मराठा क्रांती मोर्चाचं लोण महाराष्ट्राबाहेरही पसरलं आहे. कर्नाटकच्या बिदरमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून मूक मोर्चा काढण्यात आला.
2
3
हा मोर्चा पापनास गेटपासून निघून बस स्थानक, मडिवाळ चौक, जनरल करियाप्पा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शहीद भगतसिंह चौक, महात्मा बसवेश्वर चौक, छ. शिवाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकत आहे.
4
मोर्चाच्या अखेरीस युवतींच्या हस्ते विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.
5
कर्नाटकातील मराठा मोर्चेकरांनी आपल्या अनेक मागण्या शासनापुढे ठेवल्या आहेत.
6
कोपर्डीतील आरोपींना कठोर शिक्षा करण्याबरोबरच कर्नाटकात असलेल्या 8 टक्के मराठा समाजाला सरकारकडून कसल्याच प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याने मोर्चा काढण्यात आला आहे.