करिश्मा कपूरच्या नवऱ्याचं दुसरं लग्न !
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंजय कपूर यांनी करिश्मा कपूरसोबत 2003 साली लग्न केलं होतं. समायरा आणि कियान अशी दोन मुलंही त्यांना आहेत. मात्र, 2010 साली दोन्ही मुलांना घेऊन करिश्माने संजय कपूरसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. जून 2016 मध्ये दोघे वेगळे झाले.
संजय कपूर आणि प्रिया सचदेव हे गेल्या 5 वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत. त्यांची जवळीक वाढली होती. प्रिया सचदेव ही उदय चोप्रा आणि तनिशा मुखर्जीची मुख्य भूमिका असलेल्या 'नील अँड निक्की'मध्ये दिसली होती.
प्रिया सचदेवचं याआधी हॉटेल व्यावसायिक विक्रम चटवाल यांच्याशी लग्न झालं होतं.
संजय कूपर यांचं हे तिसरं लग्न, तर प्रिया सचदेव हिचं दुसरं लग्न आहे.
अभिनेत्री करिश्मा कपूरचा घटस्फोटित पती आणि उद्योगपती संजय कपूर यांनी गर्लफ्रेण्ड प्रिया सचदेव हिच्याशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर न्यूयॉर्कमध्ये ग्रँड रिसेप्शन आयोजित करण्यात आलं होतं. या रिसेप्शनला नातेवाईक आणि काही जवळच्या व्यक्तीच हजर होत्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -