ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकासाठी 'ती' हिजाब घालून धावली
यादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे अफगाणिस्तानच्या कामिया यूसुफीही या रेसमध्ये हिजाब परिधान करुन सहभागी झाली होती.
सौदी ऑलिम्पिक समितीने 2012 मध्ये ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या समावेशावरील बंदी उठवली होती. मात्र या निर्णयाला प्रचंड विरोधही झाला होता.
करीमनने ही शर्यत 14.61 सेकंदात पूर्ण केली. पण हा आकडा सध्याच्या वर्ल्ड रेकॉर्डपेक्षा (10.49 सेकंद) जास्त आहे.
करीमनने फूल बॉडी किट म्हणजे हिजाब परिधान केला होता. तिच्या या प्रयत्नाचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक झालं.
करीमनच्या आधी आणखी एक अॅथलीट हिजाब परिधान करुन सहभागी झाली होती.
22 वर्षीय करीमन सातव्या क्रमांकावर राहिल्याने ती फायनलसाठी पात्र ठरु शकली नाही.
रिओ ऑलिम्पिकमध्ये जगभरातील अॅथलिट एकत्र झाले असून पदक मिळवण्याच्या शर्यतीत अनेक विक्रम प्रस्थापित आहेत. पण यादरम्यान एका अॅथलिटने पदक मिळवण्याऐवजी वेगळाच इतिहास रचला आहे. जाणून घेऊया या अॅथलिटबाबत...
ऑलिम्पिकच्या सातव्या दिवशी सौदी अरेबियाची धावपटू करीमन अबुलजदायलने इतिहास रचला. करीमन अबुलजदायल ही 100 मीटर शर्यतीत सहभागी होणारी सौदी अरेबियाची पहिली महिला बनली आहे.