कारगील युद्धाला 17 वर्षे पूर्ण, ऐतिहासिक लढाईतील 10 गोष्टी

रिकाम्या चौक्यांव्यतिरिक्त भारतीय सैन्याला हल्ला करायला अवघड जावे म्हणून पाकिस्तानकडून मोक्याच्या जागाही ताब्यात घेण्यात आल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या लढाईत पाकिस्तानने भारतीय सैनिकांना चांगलेच झुंजावयाला लावले. अखेर 4 जुलै रोजी टायगर हिलवर भारताने ताबा मिळवला. टायगर लढाईच्या लढाईत भारताचे 5 सैनिक शहिद झाले.

कारगीलच्या द्रास येथे झालेलं हे युद्ध इतिहासातील सर्वात जास्त उंचीवर लढवलं गेलेलं युद्ध आहे. दोन्हीही राष्ट्र अण्वस्त्रसज्ज झाल्यानंतरचं हे पहिलंच युद्ध होतं.
भारत बेसावध असताना पाकिस्तानने या युद्धासाठी आमंत्रण दिलं होतं. फेब्रुवारी 1999 मध्ये पाकिस्तानी लष्कराने कडक हिवाळ्यातच भारतीय चौक्यांचा ताबा घेणे आरंभले. पाकिस्तानने ही कारवाई अतिशय सूत्रबद्धरीत्या पार पाडली.
भारतीय गुप्तहेर खात्याला या घटनेची कसलीही माहिती मिळाली नाही, त्यामुळे भारतीय गुप्तहेर खात्याच्या कार्यक्षमतेवर सर्वत्र भारतातून व जगातूनही जोरदार टीका झाली.
कारगील युद्धानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक राजकीय सामाजिक बदल पाहायला मिळाले. पाकिस्तानमध्ये युद्धानंतर लष्कर आणि सरकार यांच्यातील दरी वाढत गेली. शिवाय युद्धानंतर लगेच पाकिस्तानमध्ये लष्करी राजवट लागू करण्यात आली. (माहिती/फोटो सौजन्यःविकिपीडिया)
पाकिस्तानच्या घुसखोरीमुळे 1999 मध्ये ऐतिहासिक कारगील भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरु झालं. अनेक महिन्यांच्या प्रयत्नानंतर भारताचं 'ऑपरेशन विजय' यशस्वी झालं. या युद्धाला आज 17 वर्षे पूर्ण होत आहेत.
कारगील युद्धात टायगर हिलवरील लढाई सर्वात महत्वाची लढाई मानली जाते. टायगर हिलच्या लढाईत दोन्ही बाजूने जबरदस्त प्रयत्नल झाले.
स्पेशल सर्विसेसच्या सर्वोत्कृष्ट तुकड्या, तसेच नॉर्दर्न लाइट इन्फट्रीच्या 4 ते 7 बटालियन तुकड्या या कामात गुंतल्या होत्या.
भारताने या युद्धाची परिस्थीती ज्या संयमाने हाताळली त्याबद्दल भारताचं जगभर कौतुक झालं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -