करीना-सैफच्या मुलाच्या नावाची एवढी चर्चा का?
तैमूरचा उजवा हात आणि पाय निकामी झाला होता. चौदाव्या शतकात तुर्की, बगदाद आणि सीरियातील राज्यकर्ते लंगडा बोलून तैमूरची थट्टा करत असत. तेव्हापासूनच त्याची ओळख तैमूर-ए-लंग अशी झाली. लढाईच्या मैदानात तैमूरचा कधीही पराभव झाला नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकरीना आणि सैफच्या मुलाचं नाव तैमूर अली खान हे आधीच निश्चित झालं होतं. तैमूरचा अर्थ आहे लोह (Iron). हे अरेबियन नाव आहे.
तैमूर नाव ऐकताच तैमूरलंग लक्षात येतो. तैमूर लंग हा अत्याचारांसाठी कुख्यात होता. चौदाव्या शतकात त्याने अनेक देशांवर विजय मिळवला होता.
तैमूर अली खान या नावाची सैफ आणि करीनाच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. सैफीनाने हे नाव का ठेवलं असावं, याबाबत चर्चा सुरु आहे. या नावाचा इतिहास जाणून घेण्यासाठी, गूगल आणि ट्विटरवर तैमूर अली खानचं सर्च वाढलं आहे.
सामान्य भारतीयांच्या मतानुसार, तैमूर एक क्रूर राज्यकर्ता होता. त्याने सामान्य भारतीयांवर अत्याचार करुन सत्ता मिळवली होती. यामुळे अनेकांना तैमूर अली खान हे नाव फार आवडलं नाही.
पण सैफीनाच्या चाहत्यांना तैमूर अली खान हे नाव फारसं पसंत पडलेलं नाही. पतौडी कुटुंबाचं नाव आणि वंश चालवण्याच्या उद्देशाने हे नाव ठेवल्याचं काहींचं म्हणणं आहे. तर करीना आणि सैफच्या नाव पाहता त्यांच्या मुलाचं नाव शोभत नाही.
अभिनेत्री करीना कपूरने आज मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात मुलाला जन्म दिला. सैफ अली खान आणि करीना कपूर यांचं हे पहिलं अपत्य आहे. या दाम्पत्याने मुलाचं नामकरण तैमूर अली खान पतौडी केलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -