Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गरोदर करीनाचा लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्पवॉक
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाआधी सुपरमॉडेल कॅरेल ग्रेसियसने गरोदर असताना रॅम्पवॉक केला होता. एवढंच नाही तर ती शोस्टॉपरही होती.
रॅम्पवॉक करताना जर बाळाने पोटात लाथ मारली असती तर काय केलं असतं? हा प्रश्न विचारला असता करीना म्हणाली की, खरंतर या विचाराने मी खूप नर्व्हस झाली होते.
एकटी नाही तर आम्ही दोघेजण चालत होतो. हा क्षण माझ्यासाठी अतिशय खास आहे, असंही करीनाने सांगितलं.
रॅम्पवॉकनंतर करीना अतिशय भावूक झाली होती. हे रॅम्पवर कायम लक्षात राहिल, कारण मी आणि बाळाने पहिल्यांदाच एकत्र रॅम्पवॉक केला, असं करीना म्हणाली.
फॅशन डिझायनर सब्यासाचीने डिझाईन केलेला अतिशय भरजरी ऑलिव्ह ग्रीन रंगाचा लेंहगा, कुर्ती पॅटर्न चोळी आणि दुपट्टा यावेळी करीनाने परिधान केला होता. तर मांग टिक्यामुळे तिचं सौंदर्य अधिक खुललं होतं.
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरसाठी रविवारचा दिवस खास ठरला. कारण गरोदर करीनाने चक्क लॅक्मे फॅशन वीकच्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये रॅम्पवॉक केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -