कपूर कुटुंबाच्या ख्रिसमस लंचमध्ये तैमूरवर नजरा खिळल्या
कपूर कुटुंबाच्या नाताळ सेलिब्रेशनचे फोटो इन्स्टाग्राम, फेसबुक सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर पाहायला मिळत आहेत. सर्वांमध्ये करिना-सैफचा मुलगा तैमूर अली खान सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
नीतू कपूर यांनी शेअर केलेला तैमूर आणि रणबीर मामा यांचा फोटो इन्स्टाग्रामवर चर्चेचा विषय ठरला आहे.
दिवंगत अभिनेते शशी कपूर यांनी ख्रिसमसला सर्व कुटुंबाने एकत्र येण्याची सुरु केली परंपरा कपूर खानदानाने यावेळीही पाळली. शशी कपूर यांचे पुत्र कुणाल आणि करण कपूर सर्वांना आमंत्रित केलं होतं.
रणधीर कपूर-बबिता यांनी करिना-करिष्मा यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत काढलेल्या फोटोचं कौतुकही सर्वांच्या तोंडी आहे.
तैमूरची पणजी कृष्णा राज कपूर यांनी त्याला कडेवर उचलल्याचा फोटोही सोशल मीडियावर गाजत आहे. फोटोमध्ये करिष्मा कपूरची मुलं कियान समैराही बाजूला उभी आहेत.
ख्रिसमस लंचनंतर अरमान जैनने तैमूरसोबत व्हिडिओही काढला.
रणबीरसोबतच आदर आणि अरमान जैन यांनीही तैमूर सोबत फोटो काढले. आम्ही त्याचं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत होतो, मात्र तो सांताची स्वप्न बघत होता, असं त्यांनी म्हटलं आहे.