जुडवा-2ची कमाई 200 कोटींच्या पार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया सिनेमानं भारतात आतापर्यंत 130 कोटींची कमाई केली आहे.
तिसऱ्या आठवड्यात या सिनेमानं आपली घौडदौड अशीच चालू ठेवली.
तर या सिनेमानं दुसऱ्या आठवड्यातही चांगली कमाई केली. म्हणजेच आठव्या दिवशी 4.25, नवव्या दिवशी 5.75 कोटी दहाव्या दिवशी 8.10 कोटी, अकराव्या दिवशी 2.91 कोटी, बाराव्या दिवशी 2.45 कोटी, तेराव्या दिवशी 2.25 कोटी आणि चौदाव्या दिवशी 2.05 कोटी कमाई केली आहे.
मार्केट अॅनालिस्ट तरण आदर्शनं सोशल मीडियावर या सिनेमाच्या कमाईविषयी माहिती दिली आहे. या सिनेमानं पहिल्या दिवशी 16.01 कोटी, दुसऱ्या दिवशी 20.55 कोटी, तिसऱ्या दिवशी 22.60 कोटी, चौथ्या दिवशी 18 कोटी आणि पाचव्या दिवशी 8.05 कोटी, सहाव्या दिवशी 6.72 कोटी आणि सातव्या दिवशी 6.06 कोटींची कमाई केली आहे.
या सिनेमानं भारतासह जगभरात आतापर्यंत 203.33 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
तिसऱ्या आठवड्यापर्यंत 'जुडवा 2'नं वर्ल्डवाईड 200 कोटींची कमाई केली आहे.
वरुण धवनच्या 'जुडवा 2' या सिनेमानं फक्त देशातच नाही तर देशाबाहेरही चांगली कमाई केली आहे. तिसऱ्या आठवड्यातही या सिनेमाची चांगली कमाई सुरु आहे.