काय आहे जे डे हत्या प्रकरण?

छोटा राजन आणि दाऊद इब्राहिम यांच्यातील गँगवारच्या वादात अनेकांचे बळी गेले आहेत. याच वादाचा बळी जे डेही ठरले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण सिद्ध झाल्यास छोटा राजनला फाशीची शिक्षा सुनावली जाऊ शकते, पण ती शक्यता कमी आहे.

सतीश काल्या, अभिजीत शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगनावे, विनोद असरानी आणि दीपक सिसोडीया हे नऊ जण दोषी सिद्ध झाले आहेत.
जे डे हत्या प्रकरणी 13 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा फरार आहे. उर्वरित 11 जणांपैकी जोसेफ पॉलसन आणि जिग्ना वोरा या दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
छोटा राजन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात उपस्थित होता.
मुंबईतील विशेष मकोका कोर्टाने हा निर्णय दिला आहे. पुरावे आणि साक्षीनुसार छोटा राजन हा जे डेंच्या हत्येचा कट रचणारा मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलं होतं. छोटा राजनला काय शिक्षा सुनावली जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ज्येष्ठ पत्रकार ज्योर्तिमय डे यांच्या हत्येप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला दोषी ठरवण्यात आला आहे, तर पत्रकार जिग्ना वोरा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -