पहिल्याच संधीत जोस बटलरनं रचला सर्वात मोठा विक्रम!
टी-20मध्ये सलामीला फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या डॅमियन मार्टिनच्या नावावर आहे. त्याने द. आफ्रिकेच्या विरुद्ध 96 धावांची खेळी केली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाआधी बटलरला सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करायला मिळत असे. पण काल मिळालेल्या संधींचं त्यानं अक्षरश: सोनं केलं आणि शानदार फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं.
बटलरनं आपल्या खेळीत 4 षटकार आणि 3 चौकरांच्या मदतीनं 46 चेंडूत 73 धावा करत आपल्या संघाला 8 गडी राखून विजय मिळवून दिला.
बटलरनं सलामीवीर म्हणून फलंदाजी करताना 76 धावांची खेळी केली. याआधी इंग्लंडकडून सलामीवीर जेम्स विन्सनं मागील वर्षी शारजामध्ये 46 धावांची खेळी केली होती.
इंग्लंडच्या बटलरला आपल्या 49व्या सामन्यात पहिल्यांदाच सलामीला फलंदाजी करायला मिळाली. ही संधी मिळताच बटलरनंही सर्वात मोठा विक्रम रचला.
इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात काल खेळविण्यात आलेल्या एकमात्र टी-20 सामन्यात इंग्लंडच्या जोस बटलरनं अशी काही कामगिरी केली आहे की जी आजवर एकाही इंग्लंडच्या खेळाडूला जमली नव्हती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -