जॉस बटलरचा धमाका, सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी

बटलरने अजिंक्य रहाणेच्या साथीने 95 आणि संजू सॅमसनच्या साथीने 61 धावांची भागीदारी रचून, राजस्थानला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बटलरने आणखी एक अर्धशतक केल्यास तो सेहवागच्याही पुढे जाईल.

यापूर्वी वीरेंद्र सेहवागच्या नावावर हा विक्रम होता. वीरुने सलग पाच अर्धशतकं ठोकली आहेत.
या खेळीदरम्यान बटलरने एक असा विक्रम केला, ज्यामुळे त्याने क्रिकेट विश्वातील सर्वात स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी साधली.
बटलर आयपीएल इतिहासात सलग पाच अर्धशतकं ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.
बटलरचं यंदाच्या मोसमातलं हे पाचवं अर्धशतक ठरलं.
जॉस बटलर राजस्थानच्या या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला. त्याने 53 चेंडूंत नऊ चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 94 धावांची खेळी उभारली.
राजस्थान रॉयल्सने वानखेडेवरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून, आयपीएलमधलं आपलं आव्हान कायम राखलं. पण राजस्थानकडून झालेल्या पराभवाने मुंबई इंडियन्सच्या आव्हानाला धोका निर्माण झाला आहे.
या सामन्यात मुंबईने राजस्थानला विजयासाठी अवघं 169 धावांचं आव्हान दिलं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -