WWE मध्ये कमबॅक करणाऱ्या जॉन सीनाची प्रचंड धुलाई

करिअरमध्ये 15 वेळा वर्ल्ड चॅम्पियन बनलेला सुपरस्टार जॉन सीना याचं डब्लूडब्लूईमधील पुनरागमन फारसं चागलं झालं नाही.
मात्र जॉन सीना आणि एजे हात मिळवणीकरत होते. मात्र त्याचा विश्वासघात झाला. कारण त्याचवेळी ऐजेचे मित्र ल्यूक गॅलोज आणि कार्ल एंडरसनने रिंगमध्ये एन्ट्री घेतली. त्यानंतर तिघांनी मिळून जॉन सीनाच जबरदस्त धुलाई केली.
रिंगमध्ये येऊन एजे म्हणाला की, 'मी या दिवसाची अनेक दिवसांपासून वाट पाहत होतो. तुला रिंगमध्ये पाहून चांगलं वाटलं. आता तू फिट झालास आणि आपली भेट झाली.
एजे स्टाइल्स आणि त्याच्या दोन मित्रांनी रिंगमध्ये जॉन सीनाला खूप मारलं. यावेळी सीनाला वाचवण्यासाठी आलेल्या 5 रेफ्रींचे प्रयत्न पूर्णत: निष्फळ ठरले.
दुखापतीनंतर WWE च्या रिंगमध्ये रिटर्न फाईट करण्यासाठी उतरलेल्या जॉन सीनाची पहिल्याच सामन्यात प्रचंड धुलाई झाली.
करिअरमध्ये 15 वेळा वर्ल्ड चॅम्पियन बनलेला सुपरस्टार जॉन सीना याचं डब्लूडब्लूईमधील पुनरागमन फारसं चागलं झालं नाही.