#JNU Attack जेएनयूमध्ये शांतपणे कन्हैय्या कुमारचं भाषण आणि आझादीच्या घोषणा ऐकत होती दीपिका पादुकोण; पाहा फोटो
दीपिका पादुकोणचा आगामी चित्रपट 'छपाक' 10 जानेवारीला रिलीज होणार आहे.
जेएनयूच्या आंदोलनासाठी कन्हैय्या कुमार उपस्थित होता.
दीपिका पुढे बोलताना म्हणाली की, 'ज्या प्रकारे एखाद्या मुद्याला विरोध करण्यासाठी आपण रस्त्यावर उतरत आहोत, याबाबत मला गर्व आहे. जर समाजात बदल घडवून आणायचा असेल किंवा आपला हक्क मिळवायचा असेल तर हे आपल्याला करावं लागेल.'
एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना ती म्हणाली की, 'मला गर्व आहे की, आम्ही स्वतःचं मत व्यक्त करण्यास घाबरत नाही आणि आपण या गोष्टीचा विचार करत आहोत, आपल्या भविष्याबाबत विचार करत आहोत.'
जेएनयूमध्ये पोहोचल्यावर दीपिका काहीच बोलली नाही, परंतु आगामी चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तिने विद्यार्थांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला.
खूप वेळ तिथे थांबल्यानंतर दीपिका आपल्या गाडीत बसून तिथून निघून गेली.
दीपिकाने जेएनयूमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन दिलं. परंतु, तिने माध्यमांशी कोणताही संवाद साधला नाही.
आंदोलनात सहभागी झालेल्या दीपिकाने जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोषची भेट घेतली. हल्ल्यामध्ये आईशी गंभीर जखमी झाली आहे.
दीपिका पादुकोण आंदोलनादरम्यान तिथे उभी राहिली आणि शांतपणे विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमारचं भाषण आणि आझादीच्या घोषणा ऐकत होती.
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आज अचानक जवाहरलाल नेहरू यूनिवर्सिटीमध्ये पोहोचली. दीपिका जेएनयूच्या विद्यार्थांवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनामध्ये सहभागी झाली होती.