जिओचा नव्या वर्षासाठी Happy New Year 2018 प्लॅन
दरम्यान, नव्या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेले प्लॅन ग्राहकांना शनिवार म्हणजे उद्यापासून मिळण्याची शक्यता आहे. कारण अजून याची माहिती वेबसाईटवर अपडेट करण्यात आलेली नाही.
399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 70 दिवसांसाठी 70GB डेटा देण्यात आला आहे. दररोज 1GB डेटा वापरण्याची ग्राहकांना मर्यादा आहे. सोबतच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि मेसेजही मिळतील.
जिओचे इतरही प्लॅन आहेत. 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी 4.2GB डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये दिवसाला 300 मेसेजही मोफत आहेत.
जिओच्या प्राईम मेंबर्सनाच केवळ या प्लॅन्सचा लाभ घेता येईल.
यापेक्षाही जास्त डेटा लागत असेल तर 299 रुपयांचा प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा मिळणार आहे. शिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि मेसेज मिळणार आहेत. 28 दिवसांसाठी याची व्हॅलिडिटी असेल.
199 रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओच्या ग्राहकांना दररोज 1.2 GB डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. त्यामुळे ग्राहकांना दररोज 1.2GB डेटा वापरता येईल.
हॅप्पी न्यू ईयर प्लॅन 2018 मध्ये 199 रुपये आणि 299 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. हॅप्पी न्यू ईयर प्लॅन 2018 जास्त डेटाची गरज असणाऱ्या ग्राहकांसाठी आहे.
मुंबई : रिलायन्स जिओ नव्या वर्षीत ग्राहकांना गिफ्ट देण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने हॅप्पी न्यू ईयर प्लॅन 2018 ची घोषणा केली आहे. याअंतर्गत कंपनीने दोन नवे प्लॅन आणले आहेत.