गोवा-मुंबई विमान धावपट्टीवरुन घसरलं, सुदैवाने अपघात टळला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया विमानात 154 प्रवासी आणि 7 क्रू मेंबर होते. मुंबईच्या दिशेने प्रवासासाठी उड्डाण घेत असताना विमान धावपट्टीवरुन घसरलं.
विमानातील काही तांत्रिक कारणामुळे विमान धावपट्टीवरुन घसरलं.
“सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरुप आहेत. काही प्रवाशांना अगदी किरकोळ जखम झाली आहे. वैद्यकीय मदत घटनास्थळी पोहोचली असून, जेट एअरवेजची संपूर्ण टीम आणि दाभोळी विमानतळ प्रशासन सर्वतोपरी मदत करत आहे”, अशी माहिती जेट एअरवेजकडून देण्यात आली आहे.
‘9W 2374’ असं या जेट एअरवेजच्या या विमानाचं नाव आहे.
जेट एअरवेजचं गोवा-मुंबई विमान धावपट्टीवरुन घसरलं. मात्र, सुदैवाने मोठा अपघात टळला. गोव्यातील दाभोळी विमानतळावर ही घटना घडली. विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरुप असल्याची माहिती जेट एअरवेजने दिली आहे.
या सर्व घटनेमुळे दाभोळी विमानतळ दुपारी 12.30 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -