सोन्याची जेजुरी... खंडेरायाचा येळकोट!
एबीपी माझा वेब टीम | 18 Dec 2017 08:58 PM (IST)
1
या यात्रेमुळे मागील २ दिवसांपासूनच भाविकांची जेजुरीत प्रचंड गर्दी वाढली होती. (फोटो सौजन्य : मनोज शिंदे)
2
सोमवती अमावस्येनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दोन दिवसात तीन लाखांपेक्षाही जास्त भाविकांनी जेजुरीत खंडेरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. (फोटो सौजन्य : मनोज शिंदे)
3
कालपासूनच खंडेरायाच्या गडावर दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. (फोटो सौजन्य : मनोज शिंदे)
4
आज (सोमवार) पहाटे सहा वाजता गडावरुन पालखी निघून 'कऱ्हा' नदीतीरी दाखल झाली. या भागात कऱ्हेला गंगेइतकंच पवित्र स्थान आहे. (फोटो सौजन्य : मनोज शिंदे)
5
जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्रच लोकदैवत आहे. खंडेरायाच्या वर्षभर विविध यात्रा भरत असतात, त्यातीलच एक महत्वाची म्हणजे ही सोमवती अमावस्येची यात्रा. (फोटो सौजन्य : मनोज शिंदे)