सोन्याच्या जेजुरीत 'यळकोट यळकोट, जय मल्हार'चा गजर
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुपारी ही पालखी पुन्हा गडावर पोहचेल.
कऱ्हा नदीच्या तीरावर लाखो भक्तांच्या साक्षीने देवाच्या पालखीला स्नान घालण्यात आले.
भाविकांनी भंडारा खोबऱ्याची मुक्तपणे उधळण केली.
पालखी सोहळा नदी पात्रात पोहचल्यानंतर ‘यळकोट यळकोट जय मल्हार’, सदानंदाचा यळकोट असा खंडोबाचा जयघोष करण्यात आला.
आज पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास, सोहळा सुरु झाला. त्यांनतर कऱ्हा नदीकडे पालखीचे प्रस्थान झाले.
या यात्रेमुळे दोन दिवसांपासूनच भाविकांनी जेजुरीत गर्दी केली आहे.
वर्षभर खंडेरायाच्या विविध यात्रा भरत असतात. त्यातीलच एक महतवाची म्हणजे ही सोमवती अमावस्या.
‘यळकोट यळकोट, जय मल्हार’च्या निनादात सोन्याची जेजुरी दुमदुमली. सोमवती अमावस्येनिमित्त राज्यभरातील भाविक खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरीत दाखल झाले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -