जयदेव आयपीएल इतिहासातला सर्वाधिक महागडा भारतीय गोलंदाज

गेल्या आयपीएल मोसमात रायझिंग पुणे सुपरजायंटकडून खेळताना जयदेवने 24 विकेट घेतल्या होत्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राजस्थान रॉयल्सने त्याच्यावर सर्वाधिक 11 कोटी 50 लाख रुपयांची बोली लावत त्याला खरेदी केलं आहे. यंदाच्या आयपीएल लिलावातली ही सर्वात मोठी दुसरी बोली ठरली.

यापूर्वी दिल्ली डेअरडेव्हिल्सने इरफान पठाणला 8.6 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. जयदेवने हा विक्रमही मोडला.
आयपीएल लिलावाच्या दुसऱ्या दिवशी अनकॅप्ड खेळाडूंवर फ्रँचायझींची नजर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून पुनरागमन करणारा जयदेव उनाडकट आयपीएलच्या इतिहासातला सर्वात महागडा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
राजस्थान रॉयल्सनेच बेन स्टोक्सवर सर्वाधिक साडे बारा कोटींची बोली लावली होती. त्यानंतर साडे अकरा कोटींमध्ये जयदेव उनाडकटला खरेदी केलं. जयदेव उनाडकट गेल्या वर्षी झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत चमकला होता. त्याचा त्याला या आयपीएलमध्येही फायदा झाला.
जयदेव उनाडकटसाठी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात चढाओढ होती. मात्र शेवटी या स्पर्धेत उडी घेतलेल्या राजस्थान रॉयल्सने साडे अकरा कोटींमध्ये जयदेवला खरेदी केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -