मराठवाड्यासाठी खुशखबर, जायकवाडी 95 टक्के भरलं!
एबीपी माझा वेब टीम | 22 Sep 2017 08:56 AM (IST)
1
पण आता हे धरण काठोकाठ भरल्यानं मराठवाड्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
2
गेल्या काही वर्षात या धरणानं अक्षरश: तळ गाठला होता.
3
त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीनं गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
4
तब्बल 9 वर्षांनी जायकवाडी धरण पूर्ण भरलं आहे.
5
जायकवाडी धरण 95 टक्के भरलं आहे.
6
पाण्याची आवक आणि पाणलोट क्षेत्रातील पाऊस लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याची माहिती औरंगाबाद पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी दिली आहे.
7
धरणाचे १ ते ९ क्रमांकाचे ९ दरवाजे हे आणीबाणीसाठी राखून ठेवण्यात आलेले आहेत.
8
धरणाच्या २७ दरवाज्यांपैकी १० ते २७ क्रमांकाचे असे १८ दरवाजे प्रत्येकी ६ इंचानं उघडण्यात आले आहेत.
9
औरंगाबादच्या जायकवाडी धरणातून काल (गुरुवार) रात्री ११ वाजल्यापासून गोदावरी पात्रात १० हजार क्युसेकनं पाणी सोडण्यात येत आहे.