50 दिवसांनंतर देश स्वर्ग बनेल आणि आम्ही सगळे स्वर्गवासी: जया बच्चन
पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेकडे 50 दिवसाची मुदत मागितली आहे. मोदी म्हणाले होते की, 'भारताला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी माझ्याकडे अनेक योजना आहेत. पण मला आता 50 दिवसांपर्यंत सहकार्य करा. जर तेव्हाही काही झालं नाही तर तुम्ही मला जरुर शिक्षा द्या.'
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, जया बच्चन या ममता बॅनर्जी यांच्या नोटाबंदी विरोधातील धरणे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्या ममता बॅनर्जींसोबत मंचावरही उपस्थित होत्या.
एका व्हॉटसअॅप मेसेजचा दाखला देत जया म्हणाल्या की, 'पहिला व्यक्ती: भारत 50 दिवसात स्वर्ग बनेल. दुसरा व्यक्ती: आणि आपण सर्व स्वर्गवासी'
दरम्यान, नोटाबंदीबाबत एका न्यूज चॅनलशी बोलताना जया म्हणाल्या की, हा निर्णय लागू करण्यासाठी सरकारला अधिक तयारी करायला हवी होती.
बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन या पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाविषयी बोलताना म्हणाल्या की, 'मोदींच्या या निर्णयानं 50 दिवसानंतर देश स्वर्ग बनेल आणि आम्ही सगळे स्वर्गवासी.'
बिग बी अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांनी मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाचं बरंच कौतुक केलं होतं. पण सपा खासदार जया बच्चन यांनी पंतप्रधान मोदींच्या या निर्णयावर थेट टीका केली आहे.
तर बिग बी यांनी देखील आपल्या स्टाईलमध्ये या निर्णयाचं कौतुक केलं होतं. ते म्हणाले की, '2000 रुपयांच्या नव्या नोटेचा रंग गुलाबी आहे... 'पिंक'चा असर!'
दरम्यान, ऐश्वर्या रायनं मोदींच्या नोटाबंदी निर्णयाचं स्वागत केलं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -